बेनेट युनिव्हर्सिटी आणि एस.पी.जैन ग्रुपमध्ये ऐतिहासिक सामंजस्य करार; विद्यार्थ्यांसाठी खुलणार जागतिक शिक्षणाचे मार्ग
बेनेट युनिव्हर्सिटी आणि एस.पी.जैन ग्रुपमध्ये झालेला ऐतिहासिक सामंजस्य करार विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावरील शिक्षण प्रदान करण्याच्या दृष्टीकोनातून झाला आहे. ‘ग्लोबल पाथवे प्रोग्राम’ला या करारामुळे अधिक बळकटी मिळणार आहे. विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं ज्ञान आणि स्पर्धात्मक कौशल्यांनी हा करार सुसज्ज करतो...
बेनेट युनिव्हर्सिटी आणि एस.पी.जैन ग्रुपमध्ये ऐतिहासिक सामंजस्य करार प्रसंगी विनीत जैन आणि गौरव जैन
दी टाइम्स ग्रुपच्या उच्च शैक्षणिक संस्था बेनेट युनिव्हर्सिटीने मुंबई येथील प्रमुख आंतरराष्ट्रीय व्यवस्थापन संस्था एस.पी. जैन ग्रुपसोबत सामंजस्य करार केला आहे. या ऐतिहासिक करारामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण आणि परदेशी अनुभव मिळवण्यासाठी नवे शैक्षणिक मार्ग खुले होणार आहेत. या भागीदारीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना '2 + 2' आणि '3 + 1' मॉडेलप्रमाणे अभ्यासक्रमांची निवड करता येणार आहे.
विद्यार्थी अशी करू शकतात अभ्यासक्रमाची निवड
2 + 2 मॉडेलअंतर्गत विद्यार्थी पहिले दोन वर्षे बेनेट युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेतील आणि उर्वरित दोन वर्षे एस.पी. जैन ग्रुपच्या लंडन किंवा सिडनी येथील कॅम्पस्मध्ये पूर्ण करतील. तर 3 + 1 मॉडेलअंतर्गत विद्यार्थी बेनेटमध्ये तीन वर्षे शिक्षण पूर्ण करून, शेवटचं वर्ष एस.पी.जैन ग्रुपमध्ये पदवीपूर्व शिक्षणासाठी किंवा थेट मास्टर्स प्रोग्राममध्ये सहभागी होऊ शकतील.
AI शिकायचंय? एक रुपयाही फी लागणार नाही, IIT ऑफर करतेय 8 कोर्सेस
ग्लोबल शिक्षणासाठी बळकटी
बेनेट युनिव्हर्सिटीच्या जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या दृष्टिकोनाला अधिक बळकटी मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक ज्ञान, स्पर्धात्मक कौशल्यं, आणि व्यावसायिकतेसाठी आवश्यक अशा क्षमतांची पूर्तता होईल. हा टप्पा ‘ग्लोबल पाथवे प्रोग्राम’ला अधिक गतिमान करणारा ठरणार आहे.
बेनेट युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आणि टाइम्स ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक विनीत जैन म्हणाले, बेनेट युनिव्हर्सिटीमध्ये आमचं ध्येय विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे, तर आंतरराष्ट्रीय अनुभव, इंडस्ट्री नेटवर्किंग आणि नेतृत्त्व विकासासाठी सुसज्ज करणे आहे. एस.पी. जैन ग्रुपसोबतची भागीदारी हे आमच्या ग्लोबल पाथवे प्रोग्रामचं महत्त्वाचं पाऊल आहे.
एस.पी. जैन ग्रुपचे गौरव जैन म्हणाले, लंडन आणि सिडनीसारख्या जागतिक शैक्षणिक राजधानींमध्ये आमचं शिक्षण पद्धती परिवर्तनात्मक आहे. बेनेट युनिव्हर्सिटीसोबतची ही सामरिक भागीदारी म्हणजे जागतिक शिक्षणापर्यंत पोहोच वाढवण्याची आमची सामायिक बांधिलकी. या भागीदारीमुळे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय उद्योग, संस्कृती आणि नवोपक्रम यांचा थेट अनुभव मिळेल.
शैक्षणिक सहकार्य आणि सुविधा
या कराराअंतर्गत दोन्ही संस्था अभ्यासक्रम रचना, शिक्षण साहित्य, अध्यापन पद्धती आणि क्रेडिट ट्रान्सफरसाठी एकसंध मानके विकसित करतील. यासाठी एक पारदर्शक क्रेडिट ट्रान्सफर प्रणाली तयार करण्यात येणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचं एका कॅम्पसवरून दुसऱ्या कॅम्पसकडे सहज हस्तांतरण शक्य होईल.
या भागीदारीचा एक भाग म्हणून, विद्यार्थ्यांना व्हिसा सहाय्यता, लॉजिस्टिक सपोर्ट, ओरिएंटेशन प्रोग्राम्स आणि एक सशक्त विद्यार्थी गतिशीलता प्रणाली मिळेल. तसंच, भारत, यूके आणि ऑस्ट्रेलियामधील इंटर्नशिप, एक्सचेंज प्रोग्राम्स आणि इंडस्ट्री कोलॅबरेशनद्वारे विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय अनुभव मिळवण्याची संधी दिली जाईल.
केंद्रीय विद्यालयाचं फी स्ट्रक्चर किती असतं? वर्षातून फक्त एकदाच भरावे लागतात एवढे पैसे
विद्यार्थ्यांना काय फायदा होईल?
या ऐतिहासिक करारामुळे विद्यार्थ्यांना एस.पी. जैन ग्रुपच्या ‘मल्टी-सिटी एज्युकेशन मॉडेल’, ‘क्रॉस-कल्चरल एक्सपोजर’ आणि ‘इनोव्हेशन-बेस्ड लर्निंग’ याचा लाभ मिळणार आहे. जागतिक दर्जाच्या कंपन्यांशी नेटवर्किंग आणि इंटर्नशिपच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या या कॅम्पसेसच्या स्थानिक फायद्यांमुळे विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धेसाठी सुसज्ज केले जाईल.
MHADA Lottery 2025: मुंबईच्या वेशीवर म्हाडाची 5285 घरांची लॉटरी; स्वस्तात फ्लॅट आणि प्लॉट खरेदीची संधी, पाहा संपूर्ण वेळापत्रक
भयानक वास्तव! महिलेला प्रसूती वेदना, रुग्णवाहिकेच्या विलंबामुळे ऑटोतून प्रवास; रस्त्यात झाली प्रसूती, बाळ बाळंतीण...
Goods Train Fire: डिझेल वाहून नेणाऱ्या मालगाडीला भीषण आग; अनेक गाड्या रद्द, वाचा कुठे घडलीये घटना
महत्त्वाची बातमी! वकील उज्ज्वल निकम आणि आणखी तीन जणांची राष्ट्रपतींकडून नामनिर्देशित खासदार म्हणून नियुक्ती
ब्लू आधार कार्ड आता घरपोच मिळणार; केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही, UIDAIचे अधिकारी थेट घरी भेट देणार, जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया
“रस्ता अडवल्यास थेट 353 अंतर्गत कारवाई करा, त्यांना उचला”: अजित पवारांचे स्पष्ट आदेश
Maharashtra Weather : आषाढातच पावसाची विश्रांती, मुंबई-ठाण्यात हवामानात मोठी उलथापालथ, जाणून घ्या आजचा अंदाज
Rishabh Pant: ऋषभ पंतने लॉर्ड्सवर इतिहास रचला; मोठा विक्रम मोडला अन् रेकॉर्डचा पाऊस पाडला
टाईम्स नाऊ मराठीमध्ये (डिजिटल) टीम लीड म्हणून कार्यरत. प्रिन्ट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांत 18 वर्षांहून अधिक काळ कामाचा अनुभव. झी मी...
Goods Train Fire: डिझेल वाहून नेणाऱ्या मालगाडीला भीषण आग; अनेक गाड्या रद्द, वाचा कुठे घडलीये घटना
ब्लू आधार कार्ड आता घरपोच मिळणार; केंद्रावर जाण्याची आवश्यकता नाही, UIDAIचे अधिकारी थेट घरी भेट देणार, जाणून घ्या कशी असेल प्रक्रिया
RBI ची दोन बँकांवर मोठी कारवाई; तुमचे या बँकेत खाते आहे का? खातेदारांवर काय परिणाम होणार?
Today Gold Rate in Mumbai: सोने-चांदीच्या दरात उसळी; सोने 7100 रुपयांनी महागले, पाहा तुमच्या शहरातील आजचा भाव
AI विमान अपघातावर AAIB चा प्राथमिक चौकशी अहवाल, उड्डाणानंतर काही क्षणांतच बंद झाले फ्युएल स्विच
महाशिवरात्री उपवासाचे नियम